Posts

 प्रस्तावना: अथातो कालजिज्ञासा:-         ‘ काळ ’ या विषयाचा विचार फार प्राचीन काळापासून विविध क्षेत्रांतील विद्वानांनी केला आहे. प्राचीन तत्त्ववेत्ते , धर्मपंडित यांपासून अर्वाचीन वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनीच आपापल्या परीने ‘ काळ ’ या विषयाबाबत मत प्रतिपादन केले आहे. त्यामध्ये काळाला ‘ स्थूलरूप वस्तू ’ प्रमाणे मानण्यापासून ‘ मानवी मनाचा आभास ’ इथपर्यंत सर्व प्रकारच्या कल्पना करून त्याचे विश्लेषण केले गेले आहे. यापैकी बहुतांश सर्वांचीच मते त्यांच्या त्यांच्या विषयाला अनुसरून योग्यच आहेत. तरीही आजपर्यंत ‘ काळाची ’ व्याख्या काही सिद्ध होऊ शकलेली नाही.         प्राचीन भारतीय प्रज्ञावंतांनी ‘ काळा ’ चे केलेले विश्लेषण खूपच गहन , व्यापक आणि पूर्णत्वाकडे जाणारे आहे. विविध तत्त्वज्ञान , विचारप्रणालींमध्ये काळाच्या स्वरूपाबाबत तपशीलात काही मतांतरे असली तरी सर्व भारतीय विचारप्रणालींमध्ये काळाला ‘ विश्वनिर्मितीचा आद्य स्पंद ’ अशा दृष्टीनेच बघितले जाते. यामध्ये काळाचे अनादि-अनंत वैश्विक स्वरूप आणि मानवी बुद्धीला ...
Recent posts